World Through The Eyes of an MBA

Diary of an MBA….

चातकीय मतदान.

 

मेघ दाटूनी आले हिमवर्षावासाठी जणू,

धरित्री पुलकित झाली रोमांचला अणु रेणू.

 

पावसाची लागता चाहूल चातक झाले बेभान,

उडू लागले सैरभैर विसरून आपले देहभान.

 

पाण्याची होती त्यास प्रतिक्षा गत श्रावणापासून,

पाण्याचा थेंब पडेल म्हणून बसले ते आ-वासून.

 

पण यंदाही त्याची परत झाली फसगत,

विना पावसाने त्याची वेडया सारखी झाली गत.

 

पण तो क्षुद्र पामर काय करणार?

पुसू लागला सगळ्यान्ना, परत कधी पाउस पडणार?

 

आपल्या देशात लोकांचेही असेच आहेत हाल,

विकास कधी होणार हे विचारून ते झाले आहेत बेहाल

 

दर पाच वर्षान्नी मतदानरूपी मेघ दाटूनी येतो

लोकांच्या पैशाला आणी आशेला वाटा पाडून जातो

 

मतदानमेघाची चाहूल लागताच मतदार होतात वेडे

दिसेल त्याला वाटत सुटतात कपडे, पैसे आणी पेढे

 

लोकांना वाटते अता तरी विकास काम मार्गस्थ होतील

रस्ते, पाणी आणी वीजेचे प्रश्न ज़रा सुटतील

 

पण तीथे चातकाची जी अवस्था तीच लोकांची येथे होते

इच्छा अपेक्षा जागीच मरतात, आणी परिस्थिती परत जैसे थे

 

परत पुढील मतदाराकडूनच्या अपेक्षा बांधणीस सुरुवात होते

हे जाणून सुद्धा की पुढील पीक ही तसेच आहे जसे पूर्वीचे होते.

 

 

प्रसाद भगवंतराव कुलकर्णी

औरंगाबाद.

April 7, 2009 Posted by Prasad Kulkarni | Politics, माझ्या कविता... | , , , | No Comments Yet

आयुष्यांवर बोलू काही…

काय आयुष्य त्या चिंधीच झाडाला लटकलेल्या,
ना जमिनीवर ना आभाळात, मधल्या मधेच अडकलेल्या.

पण तिचही एक काम आहे,
स्वत: अस्तित्व टिकवण्यासाठीचा प्रयत्न आहे.

असच आहे धुलीबाबत, इकडून तिकडे उडते आलेल्या हावेसोबत.
ना ठाव ना ठिकाणा, नवीन बस्तान बसवते नवनवीन धुलीकणासोबत.

पण तरीही प्रत्येक धुलीकणासोबत तितकाच चांगला संसार करते,
भ्रमरासारखे जीवन असून सुद्धा रामासारख वागते.

पक्षांची मात्रा मज्जा असते, फक्त इकडून तिकडे उडाया,
खायच, प्यायच आणि मास्ता हवेत हिंडत राहायच.

फुलांची तर नोकरी फारच भारी,
सकाळी उठा संध्याकाळी झोपा ही मजाच काही न्यारी.

प्राणी तर त्यांच्याच दुनियेत असतात,
दिवस भर चारतात रवन्थ करतात आणि झोपतात.

अस सगळ्यांचाच चालू असत्, ठरल्या प्रमाणे.
सगळे जण चाकोरीत जगतात, निसर्गाने ठरवल्या प्रमाणे.

पण माणूस मात्रा वेगळा आहे.
त्याची जगायची रीतच वेगळी आहे.

जन्म एकच पण अनेक जन्म जगायचा प्रयत्न,
ठरवून दिलेले काम एकच, पण सगळीकडे हात पाय मारायचा यत्न.

लहानपणी उंदरसारखा, सगळीकडेच तोंड मारणार.
पौगांडात मंजारी सारखा, लपून दूध पीणार,
तरुणपणी गाढवसारखा, राब राब राबणर.
आणि म्हातारपणी अजगरसारखा, नुसताच पडून राहणार.

का? हा अनेक काम करायचा अट्टाहास का?
ठरवलेल चाकोरीबद्ध जीवन पुरेसा नाही का?
नाही. अस नाही. माणसाला जिद्द आहे काहीतरी करायची,
दिलेला पुरेसा नाही म्हणून नाही, तर मी वेगळा आहे हे सिद्ध करायची.

माणसाला माणूस म्हणताना आपणच चुकतो आहोत,
जन नाही तर प्राण्यांच्याही आपण वर आहोत.
म्हणूनच नुसते जन नाही तर जनांच्याही वर आहोत.


प्रसाद भगवंतराव कुलकर्णी
नवी मुंबई.

December 1, 2008 Posted by Prasad Kulkarni | माझ्या कविता... | , , , , , | 1 Comment

सत्य आणी स्वप्न…

सकाळच्या त्या प्रसन्न वातावरणात मी झोपलो असा कसा???
सतत खुणवणाऱ्या निद्रेच्या कवेत गेलो असा कसा???

हे मलाच नाही ठाउक, झालो कसा मी भावूक

हे मलाच नाही कळले, देहभान मी कधी विसरलो,
स्वप्नाच्या त्या रंगीत दुनियेत कधी अन् कसा हरवलो.

त्या रंगीत प्रकाशात ध्येय माझे मज दिसले,
पण त्या ठिकाणी पोहोचताच मृगजळ ते ठरले.

हे सत्य आहे की स्वप्न या विचाराने मन काहुरले,
सत्य काय हे जाणनेसाठी मन माझे सरसावले.

हे सत्य नव्हे स्वप्न जेव्हा मला कळले,
माझ्या अंगातले अवसानच सारे गळले.

जागा मी झालो तेव्हा म्हटलो, परत त्या दुनियेत जाणे नाही,
परत त्या स्वप्नांच्या चक्रव्युव्हात अड़काणे नाही,

पण आता हे नित्याचेच झाले आहे, नित्यनियम म्हणतात ना तसा,
निद्रेशी परत सलगी होते आणी त्या स्वप्नांच्या दुनियेत नकळत शिरतो हा असा.

आता सत्य अणि स्वप्न यातला फरक मला कळला,
दोघात पुसट रेशा असतात, आभास मला हा झाला.

या सगळ्यात एक मात्र स्पष्ट झाले आहे,
जे सत्यात तेच स्वप्नात आणी जे स्वप्नात तेच सत्यात हे मला उमगले आहे….
प्रसाद भगवंतराव कुलकर्णी
नवी मुंबई.

November 27, 2008 Posted by Prasad Kulkarni | माझ्या कविता... | , , , , , , , , , , , , , | 2 Comments