आयुष्यांवर बोलू काही…

काय आयुष्य त्या चिंधीच झाडाला लटकलेल्या,
ना जमिनीवर ना आभाळात, मधल्या मधेच अडकलेल्या.

पण तिचही एक काम आहे,
स्वत: अस्तित्व टिकवण्यासाठीचा प्रयत्न आहे.

असच आहे धुलीबाबत, इकडून तिकडे उडते आलेल्या हावेसोबत.
ना ठाव ना ठिकाणा, नवीन बस्तान बसवते नवनवीन धुलीकणासोबत.

पण तरीही प्रत्येक धुलीकणासोबत तितकाच चांगला संसार करते,
भ्रमरासारखे जीवन असून सुद्धा रामासारख वागते.

पक्षांची मात्रा मज्जा असते, फक्त इकडून तिकडे उडाया,
खायच, प्यायच आणि मास्ता हवेत हिंडत राहायच.

फुलांची तर नोकरी फारच भारी,
सकाळी उठा संध्याकाळी झोपा ही मजाच काही न्यारी.

प्राणी तर त्यांच्याच दुनियेत असतात,
दिवस भर चारतात रवन्थ करतात आणि झोपतात.

अस सगळ्यांचाच चालू असत्, ठरल्या प्रमाणे.
सगळे जण चाकोरीत जगतात, निसर्गाने ठरवल्या प्रमाणे.

पण माणूस मात्रा वेगळा आहे.
त्याची जगायची रीतच वेगळी आहे.

जन्म एकच पण अनेक जन्म जगायचा प्रयत्न,
ठरवून दिलेले काम एकच, पण सगळीकडे हात पाय मारायचा यत्न.

लहानपणी उंदरसारखा, सगळीकडेच तोंड मारणार.
पौगांडात मंजारी सारखा, लपून दूध पीणार,
तरुणपणी गाढवसारखा, राब राब राबणर.
आणि म्हातारपणी अजगरसारखा, नुसताच पडून राहणार.

का? हा अनेक काम करायचा अट्टाहास का?
ठरवलेल चाकोरीबद्ध जीवन पुरेसा नाही का?
नाही. अस नाही. माणसाला जिद्द आहे काहीतरी करायची,
दिलेला पुरेसा नाही म्हणून नाही, तर मी वेगळा आहे हे सिद्ध करायची.

माणसाला माणूस म्हणताना आपणच चुकतो आहोत,
जन नाही तर प्राण्यांच्याही आपण वर आहोत.
म्हणूनच नुसते जन नाही तर जनांच्याही वर आहोत.


प्रसाद भगवंतराव कुलकर्णी
नवी मुंबई.