मनाची पाटी… #Marathi #Poem


काही गोष्टी मनासारख्या,

काही गोष्टी मनाविरुद्ध,
अशी मालिका चालायचीच,
आपण मात्र मनाची पाटी कोरी करायची.
# # #
विषण्णतेच्या गर्तेतून झेप घ्यायची,
मनातला काहूर शमवायचा,
नव्या काहुराला जागा करायची,
मनाची पाटी परत कोरी करायची
# # #
काही व्यक्ती येतात अन,
आपलं आयुष्याच बदलून जातात,
ते गेले म्हणून कच नाही खायची,
मनाची पाटी परत कोरी करायची
# # #
आयुष्यात आनंदाचे क्षण येतात,
असाध्य ते साध्य होतं एकदम,
म्हणून डोक्यात हवा नाही जाऊ द्यायची,
मनाची पाटी परत कोरी करायची
# # #
आयुष्याच्या गोळाबेरजेत अनेकदा,
मनाची पाटी ओतप्रोत भरते,
कोणी येउन पुसेल याची वाट नाही पहायची,
आपल्या मनाची पाटी आपणंच कोरी करायची
— @pbkulkarni

2 thoughts on “मनाची पाटी… #Marathi #Poem

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s