ज्याचं त्याचं… #Poem

प्रत्येकाची गणितं वेगळी ,
प्रत्येकाची सुत्रं वेगळी,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
प्रत्येकाची परिघं वेगळी

* * *

कोणी भरधाव धावतं,
कोणी मागोवा घेत चालतं,
कोणी खात्रीशीर पावलं टाकतं,
तर कोणी दबकत चालतं

* * *

एकाचे पायताण दुसऱ्याला,
हा हिशोब कधी लागत नाही,
एकाचे दु:ख दुसरं कोणी,
इथे कधीच विकत घेत नाही

* * *

जो तो आपल्या परीने इथे,
आयुष्याचा किल्ला लढवतोच,
कोणी लवकर कोणी उशीरा,
डोंगर माथ्यावर पोहोचतोच

— @pbkulkarni