एक साठवण… #Marathi #Poem


मोडक्या भिंतींच्या आडून,
काही स्वप्ने डोकावून पहात आहेत,
कधी काळचा चिरेबंदी वाडा,
आता फक्त भग्न अवशेष आहेत

* * *

उध्वस्त खिडक्यांच्या चौकटीतून,
काही सूर दरवळत आहेत,
पूर्वी सोनेरी कवडसे यायचे,
आता भकास ऊन भेडसावत आहे

* * *

भेगाळलेल्या भुईवर कधी,
पुसटसे पावलांचे ठसे दिसतात,
एकेकाळी इथे संगमरवरी नक्षी हसायची,
आता फारश्यांच्या ठीकार्‍या वावरतात

* * *

परसातल्या बागेत अधूनमधून,
अंकूर डोक वर काढताना दिसतात,
पूर्वी फळा फुलांचा सडा पडायचा इथे,
आता चुरगाळलेली फुल पसरलेली दिसतात

— @pbkulkarni

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s