सोनेरी पहाट…


हरवलेल्या माझा मी ठाव कसा सांगू?
रुसलेल्या अंतर्मनाचा मी भाव कसा सांगू?
हरलोय अनेक डाव एक डाव कसा सांगू?
किती खोल रुतलाय हा घाव कसा सांगू?
# # #
सांगायचा म्हटला तरी कोणाला सांगता येत नाही,
कितीही वाटलं तरी भावनेला टांगता येत नाही,
मन मारून मला असा नांदता येत नाही,
पण नशिबाची लक्ष्मणरेषा सुद्धा लांघता येत नाही
# # #
कधीतरी नशिबाची पुण्याई पावून येईल,
दु:खामागे सुखाची लाट धावून येईल,
मनाच्या या गगनामध्ये आनंद मावून येईल,
आयुष्याची सकाळ सोनकिरणं लावून येईल
—-
— @pbkulkarni
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s