सत्य आणी स्वप्न…

सकाळच्या त्या प्रसन्न वातावरणात मी झोपलो असा कसा???
सतत खुणवणाऱ्या निद्रेच्या कवेत गेलो असा कसा???

हे मलाच नाही ठाउक, झालो कसा मी भावूक

हे मलाच नाही कळले, देहभान मी कधी विसरलो,
स्वप्नाच्या त्या रंगीत दुनियेत कधी अन् कसा हरवलो.

त्या रंगीत प्रकाशात ध्येय माझे मज दिसले,
पण त्या ठिकाणी पोहोचताच मृगजळ ते ठरले.

हे सत्य आहे की स्वप्न या विचाराने मन काहुरले,
सत्य काय हे जाणनेसाठी मन माझे सरसावले.

हे सत्य नव्हे स्वप्न जेव्हा मला कळले,
माझ्या अंगातले अवसानच सारे गळले.

जागा मी झालो तेव्हा म्हटलो, परत त्या दुनियेत जाणे नाही,
परत त्या स्वप्नांच्या चक्रव्युव्हात अड़काणे नाही,

पण आता हे नित्याचेच झाले आहे, नित्यनियम म्हणतात ना तसा,
निद्रेशी परत सलगी होते आणी त्या स्वप्नांच्या दुनियेत नकळत शिरतो हा असा.

आता सत्य अणि स्वप्न यातला फरक मला कळला,
दोघात पुसट रेशा असतात, आभास मला हा झाला.

या सगळ्यात एक मात्र स्पष्ट झाले आहे,
जे सत्यात तेच स्वप्नात आणी जे स्वप्नात तेच सत्यात हे मला उमगले आहे….
प्रसाद भगवंतराव कुलकर्णी
नवी मुंबई.