आयुष्याचं गणित…

आयुष्याचं गणित चुकलय,
कागदावरती फक्त खाडाखोड,
स्वप्न अनेक रंगांची पण,
हाती येते फक्त तडजोड 
 
आटोकाट प्रयत्न होतो मग,
डावी नि उजवी बाजू साधण्याचा,
पावलं तर बरोबर टाकली होती,
आता भाग चुका शोधण्याचा
 
सूत्रं चुकली असतील कुठेतरी,
मनात शंकेची पाल चुकचुकली,
संधी नशिबाने दिल्या असतील,
पण पकडायची संधी असेल हुकली 
 
गणिताची प्रत्येक पायरी जेव्हा,
पुन्हा एकदा पाहिली तपासून,
कळले हि गल्लत सूत्राची नव्हे,
आकडेमोड चुकली होती हातून 
 
हाती वेळ आहे तोवरच,
संधी गणित परत तपासायची,
परीक्षा संपली, वेळही संपली,
नंतर हळहळ व्यर्थचि 
 
 
— @pbkulkarni

दांवत-ए-इश्क़…

दांवत-ए-इश्क़ फरमाइए जरा,

बडी जोरो की भूख लगी है,
जल्दी से प्यार परोसिये जरा,
सदियोंसे उसकी प्यास लगी है.
<> <> <>
कुछ नमकीन, कुछ तीखा,
और कुछ मीठा हो जाए जरा,
पाचक छांस, नशीली नज़र,
और झप्पी भी हो जाए जरा.
<> <> <>
दांवत के बाद एक लंबी सैर,
हाथोंमें हाथ, न ढलता पहर,
खाने के लिए जीना, जीने के लिए खाना,
और साथ में प्यार, कुछ ऐसा हो सफर.
<> <> <>
— @pbkulkarni